Payal Naik
लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी नुकतीच दिलेली एक मुलाखत सध्या चर्चेत आहे.
या मुलाखतीत त्यांनी आपल्या बहिणीबद्दलही खुलासा केला.
नाना यांच्या बहिणीने एका मुस्लिम मुलाशी लग्न केलं त्यामुळे त्यांच्या घरात वादळ आलं होतं.
त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी तिच्याशी बोलणं बंद केलं. मात्र यावर नानांची प्रतिक्रिया वेगळी होती.
या मुलाखतीत नाना म्हणाले की, माझ्या बहिणीने अब्बासशी लग्न केलं.
माझ्या दोन्ही भावांनी तिच्याशी संबंध तोडले पण मी म्हणेन की क्या झालं?
तिने लग्न केलं पण त्यामुळे आपली बहीण आपलीच राहिली उलट आपल्याला अब्बास मिळाला.
ते दोघे शिकलेले आहेत. डॉक्टर आहेत एकमेकांवर प्रेम करतात. यात धर्म कुठून आला?