Saisimran Ghashi
उद्या आपण नारळी पौर्णिमा साजरी करणार आहोत.त्याचे नियोजन कसे आहे जाऊन घेऊया.
रविवारी सर्वानी श्रीफळ घरी आणून नारळी पोर्णिमेपर्यंत त्याचे पूजन करायचे आहे.
नारळीपोर्णिमेला समुद्र किनारी सजावट करण्यासाठी उपस्थित राहायचे असते.
संध्याकाळी ४:३० वाजता आपल्या पारंपरिक वेषात मिरवणुकीला सुरुवात केली जाते.
उद्या संध्याकाळी ५:३० वाजल्यापासून कफपरेडच्या रस्त्यावरून सुमद्रकिनाऱ्याकडे वाजत गाजत मिरवणूक निघेल.
संध्याकाळी ६ :00 वाजेपर्यंत समुद्रकिनारी पोहचल्यावर सर्व श्रीफळ व कलश रांगेत मांडून पूजन केले जाते.
सूर्यास्त होण्याच्या आधी सर्वाना श्रीफळ कलशाची सामूहिक पूजा करावी, म्हणून पारंपरिक कोळी गाण्याच्या तालावर वाजत गाजत मिरवणूक निघते.
समाजातील जेष्ठ समाजबांधव - भगिनी ह्यांच्या हस्ते अथांग सागराची कृतज्ञता पूर्वक पूजन करून आरती झाल्यावर श्रीफळ अर्पण करण्यात येईल.
समुद्रकिनारी बेंजो, स्पीकर लावून रात्री ८ वाजेपर्यंतची परवानगी प्रशासनाने दिली आहे.
सदर कार्यक्रम साजरा करताना रस्त्यावरून चालताना व तसेच समुद्र किनारी लहान मुलांची विशेष काळजी घ्यायची आहे.