कार्तिक पुजारी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला जवळपास ११ वर्ष झाली आहे. १० मे रोजी त्यांच्या खुनाप्रकरणी निकाल लागण्याची शक्यता आहे
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये मुख्य सूत्रधार 'सनातन प्रभात' चा पदाधिकारी डॉ. वीरेंद्र तावडे ( रा. सातारा) आहे.
गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे ( रा. औरंगाबाद) , शरद कळसकर ( रा. जालना ), विक्रम भावे आणि ऍड. संजीव पुनाळेकर ( दोघे रा. मुंबई ) यांच्याविरुद्ध पुण्यातील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल आले.
डॉ. तावडे याला पनवेलमधील सनातन प्रभातच्या आश्रमातून अटक करण्यात आली.
विक्रम भावे याने डॉ. दाभोलकर यांच्या खुनापूर्वी रेकी केली असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ,
ऍड. पुनावळेकर याने मारेकऱ्यांना पिस्तूल खाडीत फेकून नष्ट करण्याचा सल्ला दिला होता, असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
१० मेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे