Anuradha Vipat
अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने महिला दिनानिमित्त बॉलीवूड चित्रपटांमध्ये महिलांचे चित्रण कसे बदलले आहे यावर खास नजर टाकून बी टाऊन मधल्या अभिनेत्री किती सशक्तपणे काम करतात हे सांगितलं आहे.
या बद्दल बोलताना नर्गिस म्हणते "बॉलीवूड चित्रपटांमधील महिलांचे चित्रण गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या विकसित झाले असून त्या सामाजिक नियम, सांस्कृतिक बदल आणि जागतिक ट्रेंड नुसार आपल काम उत्तमपणे करत आहेत
नर्गिस पुढे सांगते " चित्रपट उद्योगातील महिलांना अधिक स्क्रीन टाईम मिळत आहे. महिलांकडे आता केवळ एक प्रॉप किंवा इच्छा म्हणून पाहिले जात नाही नसून त्यांचा अभिनयाच कौतुक होत आहे
नर्गिस पुढे सांगते. हे चित्रण वर्षानुवर्षे अधिक सूक्ष्म, वैविध्यपूर्ण आणि सशक्त बनले आहे "
रणबीर कपूर स्टारर 'रॉकस्टार' मधून प्रभावी पदार्पण करणाऱ्या नर्गिसने 'अझहर', 'हाऊसफुल 3' आणि इतर सारख्या अनेक प्रकल्पांसह एक अभिनेत्री म्हणून तिचे अष्टपैलुत्व दाखवले आहे
नर्गिस 'ततलुबाज' या ओटीटी प्रोजेक्टमध्ये शेवटची दिसली होती.