Anuradha Vipat
" रॉकस्टार " हा चित्रपट देखील थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाले आहे
या चित्रपटाला चित्रपट गृहात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे
यावर प्रतिक्रिया देताना नर्गिस फाखरी ने खास भावना व्यक्त केल्या आहेत.
या बद्दल बोलताना नर्गिस म्हणते " चाहत्यांच्या उदंड प्रतिसादाबद्दल मला खूप आनंद होतोय. 2011 मध्ये प्रदर्शित झालेला माझा चित्रपट तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.
पुढे नर्गिस म्हणते, या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर दोन आठवड्यांनंतर 1.10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. खरं तर 14 दिवसांत हा चित्रपट 1 लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे.
रॉकस्टारच्या पुन्हा रिलीजला मिळालेल्या प्रतिसादाने मी खूप भावूक झाली आहे आजही प्रेक्षकांनी तितकच प्रेम दिलं आहे. 12 वर्षांनंतर देखील लोकांचा या चित्रपटाला प्रतिसाद पाहून हे पुन्हा एकदा बॉलिवुड मध्ये पदार्पण झाल्यासारख वाटत आहे असंही पुढे नर्गिस म्हणते
पुढे नर्गिस म्हणते, जेव्हा आम्ही चित्रपटावर काम करत होतो तेव्हा आम्हाला माहित नव्हते की आम्ही एक कल्ट क्लासिक बनवत आहोत. मी अशा चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला खूप अभिमान वाटतो.