सकाळ डिजिटल टीम
कोल्हापूर : एकेकाळी स्त्री म्हणजे चूल आणि मूल एवढेच क्षेत्र मर्यादित समजले जायचे; परंतु आज महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांत आघाडी मिळवली आहे. कोणत्याही क्षेत्रात महिला नाही, असे क्षेत्र शिल्लक नाही. नोकरी करायची तर घरच्या पुरुषांनीच करायची... असा माफक रिवाज सोडून महिला घराबाहेर पडली आणि आज ‘नारीशक्ती’चे रूप समाजाला पाहावयास मिळाले. त्याची काही चित्रमय झलक.
विजेच्या खांबावर जाऊन दुरुस्ती करणे म्हणजे पुरुष वायरमनची मक्तेदारी... आता सीमा गुरव यांच्यासारख्या अनेक महिला महावितरणमध्ये खांबावरील दुरुस्तीची जोखमीची कामे सहजपणे करत आहेत.
पोलिस भरतीनंतर रस्त्यावर उभे राहणाऱ्या वाहतूक पोलिसाप्रमाणे स्मिता अशोक जाधवसारख्या महिला पोलिसांनी क्रीडा क्षेत्रात नाव कमावून एमटीचालक म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
महिलांनी ‘चूल-मूल’ सोडून स्वयंरोजगार मिळवला. डोक्यावरून माळवं विकायला जाणारी महिला बाजारात भाजीचे स्टॉल मांडून स्वयंसिद्ध झाली.
पतीच्या उद्योगाला हातभार लावण्यासाठी स्त्रीने घन हातात घेतला आणि ऐरणीवर घाव घालून तिच्यातील आत्मबलाची प्रचीती दिली.
शेतीमध्ये केवळ जनावरांची धार काढणे आणि वैरण घालण्याचे काम ग्रामीण महिलांचेच गणले जायचे. आज ग्रामीण भागातील ऋतुजा राणेसारख्या महिला ट्रॅक्टरने शेती नांगरून आधुनिक शेतीचे तंत्र हाताळत आहेत.
सुशिक्षित झालेल्या महिलांनी खासगी, बँकिंग आणि सरकारी कार्यालयात आपला ठसा उमटवला आहे. (फोटो : मोहन मेस्त्री)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.