गुरू ग्रहाच्या चंद्रावर नासा नेणार 'पाणी'

Sudesh

युरोपा

गुरू ग्रहाच्या अनेक चंद्रांपैकी युरोपा या चंद्रावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याची शक्यता आहे.

NASA Europa Clipper | eSakal

नासा

या चंद्रावर जाण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा एक मोहीम राबवणार आहे. युरोपा क्लिपर असं या मोहिमेचं नाव आहे.

NASA Europa Clipper | eSakal

शब्द

या यानासोबत एक सांकेतिक शब्दाचं रेकॉर्डिंग पाठवण्यात येणार आहे. ऑक्टोबर महिन्यात ही मोहीम लाँच होईल.

NASA Europa Clipper | eSakal

पाणी

'पाणी' हा शब्द युरोपा चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. जगातील 103 भाषांमध्ये या शब्दाचं रेकॉर्डिंग करण्यात आलं आहे.

NASA Europa Clipper | eSakal

हिंदी

यात हिंदीचाही समावेश आहे. हे शब्द ‘टँटलम’ या धातूपासून बनविलेल्या ७ बाय ११ इंचाच्या पट्टीवर रेखांकीत केले आहेत.

NASA Europa Clipper | eSakal

कविता

‘युरोपा क्लिपर’ यानातून ध्वनितरंग पट्टीबरोबरच अमेरिकेचे प्रख्यात कवी ॲडा लिम यांची ‘इन प्रेज ऑफ मिस्ट्ररी : ए पोएम फॉर युरोपा’ या कवितेचे हस्तलिखितही पाठविण्यात येणार आहे.

NASA Europa Clipper | eSakal

मायक्रोचिप

त्याचबरोबर जगभरातील २६ लाख लोकांच्यी नावांची नोंद असलेली सिलिकॉन मायक्रोचिपही पाठविण्यात येणार आहे.

NASA Europa Clipper | eSakal

संदेश

सर्व प्रकारच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याद्वारे पृथ्वी आणि या रहस्यमय महासागराशी संबंध जोडण्यासाठी हा संदेश महत्त्वपूर्ण आहे.

NASA Europa Clipper | eSakal

आपला चंद्र गोल नाही? वाचा स्पेसबद्दल अजब गोष्टी

Interesting Space Facts | eSakal
येथे क्लिक करा