Sudesh
जगभरातील कित्येक अंतराळ संशोधन संस्था या परग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेत आहेत.
यातच नासाला आता 17 असे एक्झोप्लॅनेट मिळाले आहेत, ज्यावर पाण्याचा मोठा साठा असू शकतो.
जीवाच्या निर्मितीसाठी पाण्याचं अस्तित्व महत्त्वाचं आहे. त्यामुळेच हे ग्रह संशोधकांसाठी आकर्षण ठरत आहेत.
एक्झोप्लॅनेट म्हणजे असे ग्रह, जे आपल्या सूर्याप्रमाणे एखाद्या ताऱ्याभोवती फिरत आहेत.
नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटरमधील डॉ. लिने क्विक यांच्या पथकाने या 17 ग्रहांचा शोध लावला आहे.
या संशोधनात आपल्याला राहण्यासाठी योग्य अशा ग्रहांवर लक्ष केंद्रित न करता, अगदी थंड असे ग्रह शोधण्यावर भर देण्यात आला.
या सर्व ग्रहांवर वरच्या बाजूला बर्फाची चादर असू शकते, आणि या चादरीखाली प्रचंड असे महासागर असू शकतात.
या ग्रहांवर जीवन असेल की नाही याबाबत संशोधनात माहिती देण्यात आलेली नाही. याबाबत अभ्यास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.