'या' ग्रहावर पडतो मातीचा पाऊस; गुरूएवढा आहे मोठा

Sudesh

अंतराळ

आपल्या अंतराळात अब्जावधी ग्रह आहेत. जगभरातील अंतराळ संशोधन संस्था या सातत्याने नवनवीन ग्रहांचा शोध घेत असतात.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

नासा

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने यासाठी जेम्स वेब या टेलिस्कोपची निर्मिती केली आहे. याच्या मदतीने कित्येक प्रकाशवर्षे दूरचे ग्रह टिपता येतात.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

नवा ग्रह

या टेलिस्कोपने आता एका नव्या ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह आपल्या सौरमालेतील गुरू ग्रहाएवढा आहे.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

Wasp-107b

या एक्झोप्लॅनेटला नासाने WASP-107b असं नाव दिलं आहे. या ग्रहाला कँडी फ्लॉस असंही म्हटलं जातं.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

कँडी फ्लॉस

या ग्रहाची घनता ही याच आकाराच्या इतर वायू-ग्रहांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. त्यामुळेच याला 'कँडी फ्लॉस' असंही म्हटलं जात आहे.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

मातीचा पाऊस

या ग्रहाच्या वातावरणात वाफ, सल्फर डायऑक्साईड आणि सिलिकेटचे ढग पहायला मिळाले. यामुळेच या ग्रहावर चक्क मातीच्या कणांचा पाऊस पडत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal

किती दूर

हा ग्रह पृथ्वीपासून 200 प्रकाशवर्षे दूर आहे. आपल्या सूर्यमालेतील नेपच्यून ग्रहाएवढी वास्पची घनता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WASP-107b Sand Rain Planet | eSakal