Pranali Kodre
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि मॉडल नताशा स्टँकोव्हिच यांनी ४ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
जुलै २०२४ मध्ये त्यांनी वेगळे झाल्याचे जाहीर केले होते.
याबरोबरच त्यांनी त्यांच्या मुलाचे अगस्त्यचे मात्र सहपालकत्व स्वीकारल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, हार्दिकपासून वेगळे झाल्याचं जाहीर केल्यानंतर नताशा अगस्त्यसह सार्बियाला तिच्या घरी गेली होती.
त्यानंतर आता जवळपास दीड महिना सार्बियामध्ये राहिल्यानंतर पुन्हा ती मुंबईत परतली आहे.
नताशाने ती मुंबईत आल्याच्या पोस्टही इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
पण, नताशा अगस्त्यला घेऊन मुंबईत आली आहे की नाही, हे तिच्या पोस्टमधून स्पष्ट झालेले नाही.