राहुल शेळके
हिंडेनबर्गने SEBI प्रमुख माधबी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांच्यावर कथित अदानी घोटाळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला.
अमेरिकन शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग स्टॉक मार्केटमध्ये होणाऱ्या अनियमिततेवर लक्ष ठेवते. हिंडेनबर्ग कंपन्यांमध्ये चालू असलेली आर्थिक अनियमितता उघड करते.
2017 मध्ये, नॅथन अँडरसन नावाच्या व्यक्तीने हिंडेनबर्ग फर्मचा पाया घातला.
अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या नॅथनने ॲम्ब्युलन्स चालक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
नंतर अँडरसनने फॅक्ट सेट रिसर्च सिस्टम्स नावाची डेटा फर्म सुरू केली. त्यानंतर ते गुंतवणूक व्यवस्थापन कंपन्यांमध्ये काम करत राहिले.
हिंडेनबर्गने अनेक कंपन्यांबाबत असेच खुलासे केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी शेअर्स शॉर्ट सेलिंग करून मोठी कमाई केली आहे. कंपनीने अदानी समूहासह विविध कंपन्यांचे एकूण 19 अहवाल प्रसिद्ध केले आहेत.
कंपनीचे काम शॉर्ट सेलिंग करून पैसे मिळवणे आहे. त्यांच्या यादीत अमेरिकन ते भारतीय कंपन्यांचा समावेश आहे.
नॅथन अँडरसनच्या संपत्तीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु एका अंदाजानुसार, अँडरसनकडे 5 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती आहे.