साक्षी राऊत
आज नॅशनल पास्ता डे आहे. या निमित्ताने आपण झटपट बनणारी पास्ता रेसिपी जाणून घेऊया.
पास्ता -१ कप, कापलेला कांदा, १ टीस्पून किसलेलं आलं, १ स्पून मोजरेला चिज, १ चिमूट चिली फ्लेक्स, लाल मिर्ची पावडर १ टीस्पून, टोमॅटो सॉस- १ टीस्पून, एगलेस मेयोनिज - १ टीस्पून, कापलेली हिरवी मिर्ची, तेल आणि मीठ.
मसाला पास्ता बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी घालून गरम करा. पाणी उकळण्यास सुरुवात झाली की त्यात पास्ता घाला.
पास्ता ५-६ मिनिट उकळवा. पास्ता नरम झाला की की चाळणीने पाणी चाळून पास्ता वेगळा करा. त्यानंतर त्यावर थंड पाणी घाला. आणि पास्ता वेगळा ठेवा.
आता हिरवी मिर्ची, कांदा, टोमॅटो आणि आल्याचे बारीक काप करा. आणि मिक्सरमधून बारीक करून घ्या.
आत एक कढई घ्या आणि त्यात तेल गरम करून घ्या. त्यात तयार केलेली पेस्ट घाला.
पेस्ट १-२ मिनिट परतल्यानंतर त्यात मेयोनीज, टोमॅटो सॉस, चिज, लाल मिर्ची पावडर घालून मिक्स करून घ्या. नंतर चवीनुसार मीठ घाला.
तुमचा चटपटीत मसाला पास्ता अगदी तयार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.