सकाळ डिजिटल टीम
चेहरा हा आपल्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असल्याने आपण चेहऱ्याच्या सौंदर्याकडे पुरेसे लक्ष देतो.
अनेकदा धूळ, प्रदूषण, ऊन यांमुळे आपले हात आणि पाय काळे पडतात.
आपण पार्लरला जाऊन हातापायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी कितीही महाग ट्रिटमेंट्स केल्या तरीही त्याचा प्रभाव पुढचे काहीच आठवड्यांसाठी दिसतो.
काही सोप्या स्टेप्समध्ये प्युमिक स्टोनच्या मदतीने आपण आपल्या हातापायांचे सौंदर्य राखू शकतो
प्युमिक स्टोन (Pumice Stone) हा एक प्रकारचा दगड आहे. दगडाचा वापर त्वचा स्वच्छ करण्यासाठीच केला जातो इनग्रो हेअरची वाढ थांबण्यासाठीदेखील या दगडाचा वापर परिणामकारक ठरतो.
प्युमिक दगड वापरताना पाय किंवा हात सर्वात आधी कोमट पाण्यात भिजवावे ज्यामुळे त्वचा मऊ होते आणि स्वच्छ करण्यास मदत होते.
त्वचेवर साबण किंवा तेल लावूनही आपण प्युमिक दगडाचा वापर करू शकता.
त्वचेवर हा दगड एक ते दोन वेळा हळूवार घासल्यास आपल्या त्वचेवरील डेड स्कीन आणि धुळ, माती निघून जाते.
त्वचेला एक्सफोलिएट केल्यावर पुसून मॉइस्चराइझर लावण्यास विसरू नये.
प्युमिक स्टोनचा वापर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
प्युमिक स्टोनचा वापर झाल्यावर त्वचा आणि प्युमिक स्टोन दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवावे.
पायांच्या टाचांवरील जाड स्कीन काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करू शकता
अंगावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी आपण नियमित प्युमिक स्टोन वापरू शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.