Pranali Kodre
टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान संघात सामना झाला.
न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना झाला.
या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
मात्र, भारताचा संघ 19 षटकातच 119 धावांवर सर्वबाद झाला. टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानने भारताला पहिल्यांदाच सर्वबाद केले.
या सामन्यात भारतीय संघ एका क्षणी 11 षटकात 3 बाद 89 अशा चांगल्या स्थितीत होता. मात्र, त्यानंतर अवघ्या 8 षटकात भारताने 30 धावा अधिक जोडताना तब्बल 7 विकेट्स गमावल्या.
त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू भडकला होता.
समालोचन करताना सिद्धू म्हणाला, 89 धावांवर तीन बाद वरून 119 धावांवर भारतीय संघ ऑल आऊट. हा एक गुन्हाच आहे. टी20 मध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला ऑल आऊट केले.