Anuradha Vipat
अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्फ बोर्डाविरोधातील वक्तव्यावर राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाने आक्षेप घेतला आहे
हिंदू-मुस्लिम भावना भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची दखल घ्यावी, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं आहे.
राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे राज्य प्रमुख इद्रिस नायकवडी यांनी अभिनेत्री केतकी चितळेच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
वक्फ बोर्डाला राज्य सरकारने दिलेल्या निधीवर केतकी चितळेने एक व्हिडीओ शेअर करत टीका केली आहे.
वक्फ बोर्डाचे एकच कार्यालय राज्यात आहे. त्यामुळे या कार्यालयाचे विभाजन करून प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीचे कार्यालय उभारण्यात येणार आहे असंही त्यांनी म्हटले आहे
या कार्यालयासाठी 10 कोटी रुपये सरकारने दिले, याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत असंही ते म्हणाले आहेत
केतकी चितळे नेहमीचं वादग्रस्त विधान करत असते