Anuradha Vipat
नीना गुप्ता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी सिनेमांमध्ये केलेल्या वाईट कामांबद्दल सांगितलं आहे.
नीना गुप्ता म्हणाल्या, ‘गरजेनुसार गोष्टी बदलत जातात. पूर्वी पैशांची अधिक गरज असल्यामुळे वाईट, नको ती कामं केली आहे.
पुढे नीना गुप्ता म्हणाल्या,‘एखाद्या सिनेमाची स्क्रिप्ट आवडली नसेल तर, मी स्वतः सिनेमासाठी नकार देते. पण आधी परिस्थिती वाईट होती
इंडस्ट्रीमध्ये नवीन होती म्हणून नाही देखील बोलू शकत नव्हती. सुरुवातीचे दिवस फार कठीण होते. ‘ असं देखील नीना गुप्ता म्हणाल्या.
याआधी देखील नीना गुप्ता यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.
वयाच्या 63 व्या वर्षी देखील नीना गुप्ता चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत.