Anuradha Vipat
नीना गुप्ता यांच्या ‘पंचायत’ या सीरिजचा तिसरा भाग नुकताच प्रदर्शित झाल आहे
त्यानिमित्ताने नीना गुप्ता यांनी एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीदरम्यान नीना यांना एका विचारलं की, तुम्ही खूप भूमिका केल्या आणि जेव्हा तुम्ही त्या भूमिकेत असता तेव्हा तुम्हाला असचं वाटतं का की ती भूमिका तुम्ही जगताय
यावर नीना गुप्ता म्हणाल्या, “माझा एक फायदा आहे जो म्हणजे माझा चेहरा अगदी सामान्य प्रकारचा आहे.
नीना गुप्ता पुढे म्हणाल्या, “मी बंगाली, साउथ इंडियन, बिहारी, पंजाबी दिसू शकते. कारण देवाने मला असा चेहरा दिलाय की ज्याचा मला फायदा होतो.
पुढे नीना गुप्ता पुढे म्हणाल्या,चेहऱ्याचा तोटा पण होतो, मला एका वेळेस टाईपकास्ट केलं नाही जायचं आणि मग मला भूमिका मिळायच्या नाहीत.
नीना गुप्ता यांनी तीन दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.