सकाळ डिजिटल टीम
नीरज चोप्रा भारताचा सर्वात यशस्वी ॲथलिट असून त्याने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एक सुवर्णपदक तर एक रौप्यपदक जिंकले आहे.
नुकत्याच झालेल्या डायमंड लीग २०२४ मध्ये नीरज चोप्राने २०२४ च्या हंगामाचा शेवटचा सामना खेळला. परंतु तिथे त्याला ०.०१ मीटरने पराभवाचा सामना करावा लागला.
नीरज चोप्राच्या भालाफेक या खेळात शारीरिक ताकदीची अत्यंत गरज असते. त्यामुळे नीरज आपल्या शरीरिक आरोग्यासाठी कोणता आहार घेतो हे जाणून घेऊयात.
नीरज चोप्रा आधी शाकाहारी होता, परंतु २०१६ नंतर त्याने आपली ताकद वाढवण्यासाठी मांसाहार खाण्यास सुरूवात केली.
नीरज सर्वाधिक प्रोटीन्स मिळवण्यासाठी आहारातमध्ये प्रामुख्याने मांस खातो.
त्याला मासे खायला जास्त आवडते. ज्यामध्ये त्याला रावस ( Salmon fish) मासे आवडतात.
१ किलो Salmon ची किंमत २४०० पर्यंत आहे.
नीरजच्या आहारात अंड्याचाही समावेश असतो.
नीरज चोप्रा स्नॅक्स मध्ये प्रामुख्याने खजूर, गुळ व दुध हे पदार्थ असतात.