Pranali Kodre
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेसाठी ३० जुलै रोजी दाखल झाला आहे.
भालाफेकपटू नीरज यापूर्वी तुर्कीमध्ये सराव करत होता.
आता नीरज यंदा पॅरिसमध्ये सुवर्णपदक राखण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याने २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकले होते.
नीरजला यंदा झेक प्रजासत्ताकच्या याकुब वाल्डेचचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.
नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ६ ऑगस्ट रोजी मैदानात उतरेल. ६ ऑगस्टला पुरुष भालाभेकीची पात्रता फेरी दुपारी पावणे दोनच्या सुमारात सुरू होईल.
नीरजसह यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत भारताचा किशोर जेनाही सहभागी होणार आहे.
भालाफेकीच्या पात्रता फेरीतून अंतिम फेरीसाठी खेळाडू पात्र ठरतील. अंतिम फेरी ८ ऑगस्ट रोजी रात्री ११.५५ वाजता चालू होणार आहे.