Swadesh Ghanekar
भालाफेकपटू नीरज चोप्रा हा भारतात एक स्टार आहे. टोकियोतील सुवर्णपदकाने तो गोल्डन बॉय झाला
मैदानी क्रीडा प्रकारात भारताला ११८वर्षांच्या ऑलिम्पिक इतिहासात वैयक्तिक सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू होता.
त्या सुवर्णपदकामुळे नीरजच्या मागे मोठमोठे ब्रँड्स उभे राहिले आणि खेळाडूला जाहीराती मिळाल्या.
नीरजला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत ८९.३५ मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक जिंकता आले.
भालाफेकपटू नीरज चोप्रा याची नेट वर्थ ही ३७ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा, जाहीराती आणि तो भारतीय सैन्यात ज्युनियर कमिशन ऑफिसर आहे, यातून नीरजला महिन्याला ३० लाख उत्पन्न मिळते.
नीरजचा हरयाणाच्या खांद्रा येथे तीन मजली आलिशान बंगला आहे.
नीरजच्या बंगल्याचे गेट उघडताच महागड्या गाड्यांची रांग लागलेली दिसते. शिवाय बाईक्सही आहेत.
नीरजच्या महागड्या गाड्यांमध्ये २ कोटींची रेंज रोव्हर स्पोर्ट्स, ९३ लाखांची फोर्ड मुस्टॅंग, ५० लाखांची टोयोटा फॉर्च्युनर आदी कार्स आहेत.