कार्तिक पुजारी
भाला फेक स्पर्धेत नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावलं आहे
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ चा लांब भाला फेकला अन् सुवर्ण आपल्या नावावर केलं
नीरज चोप्राने सुवर्णसाठी खूप प्रयत्न केले होते, पण त्याच्या पदरी निराशा पडली. रौप्य पदकं जिंकल्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली आहे
सुवर्ण जिंकण्याची पूर्ण तयारी केली होती, पण आज अर्शद नदीमचा दिवस होता, असं तो म्हणाला आहे
भारताचा तिरंगा फडकला आहे पण, राष्ट्रगीत वाजलं नाही त्याची खंत असेल.
प्रत्येक खेळाडूला आपलं राष्ट्रगीत वाजावं असं वाटतं, तो एक वेगळाच अनुभव असतो, असं देखील तो म्हणाला.
सुवर्ण जिंकलेल्या खेळाडूच्या देशाचाचे राष्ट्रगीत वाजवलं जाते.