Swadesh Ghanekar
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भाला फेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले.
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८९.४५ मीटर फेकलेल्या भाल्यामुळे रौप्यपदक निश्चित झाले. अँडरसन पीटरने ८८.५४ मीटरसह कांस्यपदक नावावर केले.
नीरज चोप्राला सहापैकी एकाच प्रयत्नात अचूक भाला फेकता आला.. त्याने ५ प्रयत्नांत फाऊल केले.
सामन्यानंतर नीरजने त्याच्या दुखापतीबाबत सांगितले. त्याच्या मांडीला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेनंतर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणार असल्याचे त्याने सांगितले. कदाचित शस्त्रक्रियाही करावी लागेल असे तो म्हणाला.
माझ्या मांडीला दुखापत झाली होती. मी लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे, कदाचित शस्त्रक्रिया करावी लागेल...
नीरजच्या रौप्यपदकानंतर त्याच्या आईनेही भारतीय खेळाडूला दुखापत झाल्याचे सांगितले. त्यामुळेच हे रौप्य सुवर्णपदकासारखेच असल्याचे त्या म्हणाल्या.
नीरज घरी आल्यावर त्याला स्वतःच्या हाताने जेवण बनवून देईन. मी त्याची वाट पाहतेय, असे त्याची आई म्हणाली