अनिरुद्ध संकपाळ
पाकिस्तान क्रिकेटसाठी गेल्या काही दिवसांपासून एकही चांगली बातमी येत नाहीये.
संघ टी 20 वर्ल्डकपमधून ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला. आता हारिस रौऊफला देखील आपलं स्थान गमवावं लागलं आहे.
आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं 100 विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत अफगाणिस्तानचा राशिद खान हा अव्वल स्थानावर आहे. त्याने 53 सामन्यात हा कारनामा केला होता.
त्यानंतर हारिस रौऊफ 71 सामन्यात 100 विकेट्स घेत दुसऱ्या स्थानावर होता. मात्र नेपाळच्या संदीप लामिछानेने त्याचे हे स्थान हिसकावून घेतले आहे.
आता 54 सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी 20 विकेट घेणारा संदीप दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे तर हारिस तिसऱ्या स्थानावर घसरला.
या यादीत आयर्लंडचा मार्क इडायर चौथ्या स्थानावर असून त्यानं 72 सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी 20 विकेट्स घेतल्या होत्या.
पाचव्या स्थानावर ओमानचा बिलाल खान आहे. त्यानेही 72 सामन्यात 100 आंतरराष्ट्रीय टी 20 विकेट्स घेतल्या.
सहाव्या स्थानावर लसिथ मलिंगा असून त्याला 100 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्यासाठी 76 सामने खेळावे लागले.