Anuradha Vipat
आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.
ज्यामध्ये आलियाचा बॉडीगार्ड सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याशी गैरवर्तन करताना दिसत आहे.
हे पाहून नेटकऱ्यांनी मात्र प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
तसेच मात्र या व्हिडीओमध्ये आलियानेसुद्धा याबाबत राग व्यक्त केल्याचे दिसून आले आहे
आलिया तिच्या टीमसोबत एअरपोर्टवरून बाहेर येत असताना अनेक चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी तिथे थांबले होते.
त्यावेळी अनेक चाहते आलियासोबत सेल्फी घेत होते.
अचानक एक चाहता तिच्याजवळ सेल्फी घेण्यासाठी म्हणून येऊ लागला तेव्हा तिच्या बॉडीगार्डने त्याच्यासोबत धक्का मारत गैरवर्तन केलं.