साक्षी राऊत
लग्नासाठी राशी जुळणे महत्वाचे असते.
जर दोन विरुद्ध राशी असलेल्यांचे लग्न झाले तर त्यांच्या आयुष्यात कलह व अशांतता असते. चला तर मग जाणून घेऊ अशा कोणत्या राशी आहेत ज्यांनी लग्न करण्यापासून सावधान राहिले पाहिजे.
ज्योतिषानुसार कर्क आणि सिंह राशिच्या लोकांनी लग्न केल्यास त्यांच्यात एक विचित्र संघर्ष असतो. कारण असे आहे की कर्क राशीतील लोक जोडीदारावर मनापासून प्रेम करतात. परंतु सिंह राशीतील लोकांच्या असुरक्षित भावनेमुळे त्यांच्यात बरेच मतभेद होऊ शकतात.
ज्योतिषशास्त्रा नुसार कुंभ आणि मकर राशीवाले दोघेही आपले संबंध निभावण्यासाठी तयार असतात. पण दोघेही स्वतःच्या वेगवेगळ्या वागण्यामुळे सतत भांडत राहतात.
ज्योतिषशास्त्रा नुसार, मिथुन व कन्या राशीतील लोकांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे या दोघांची समजून घेण्याची क्षमता असते. कन्या राशीवाले नाते व्यावहारिक पद्धतीने सांभाळते तिथे मिथुन राशीवाले लोकं खूपच भावनिक असतात.
ज्योतिषाशास्त्रा नुसार वृषभ आणि तुळ राशीतील लोकं काचेसारखे स्वच्छ व पारदर्शी असतात. त्यांच्यात एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती आणि जबरदस्त प्रेम पहायला मिळते. हे दोघे जास्त काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत.
ज्योतिषानुसार मीन आणि वृश्चिक राशीतील लोकांचे खचितच सापडेल असे रेअर कॉम्बिनेशन दिसून येते. परंतु येथे एक समस्या आहे ती म्हणजे वृश्चिक त्याचे प्रेम व्यक्त करण्यात अत्यंत निष्काळजी असतात आणि मीन राशीतील लोकं अत्यंत भावनाप्रधान असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.