BBL मध्ये स्टम्पचा झगमगाट; षटकार, चौकारालाही देणार दाद

अनिरुद्ध संकपाळ

क्रिकेटमधील नवनवीन प्रयोग हे पहिल्यांदा बीग बॅश लीगमध्येच होतात.

यापूर्वी 2012 मध्ये लाईट लागणाऱ्या बेल्स देखील बीबीएलमध्ये पहिल्यांदा वापरण्यात आल्या होत्या. आता बीग बॅश लीगमध्ये नवीन स्टम्प आली आहे.

ही स्टम्प पूर्णपणे इलेक्ट्रिक असून चौकार, षटकार, विकेट, नो बॉल आणि वाईड बॉल टाकण्यात आल्यानंतर या स्टम्पमध्ये विशिष्ट प्रकारच्या लाईट्स लागतात.

ज्यावेळी फलंदाज बाद होतो त्यावेळी या स्टम्पमध्ये लाल रंगाची लाईट लागते.

त्याचबरोबर ज्यावेळी एखादा फलंदाज चौकार मारतो त्यावेळी या स्टम्पचा रंग बदलणार आहे.

तसेच फलंदाज षटकार मारतो त्यावेळी स्टम्पचे रंग वरून खाली बदलत जाणार आहे.

गोलंदाजांनी नो बॉल टाकल्यानंतर लाल आणि पांढरे रंग स्क्रोल होतील.

दोन षटकांच्या मधे स्टम्प पर्पल आणि निळ्या रंगाची होईल, हे रंग स्क्रोल देखील होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.