सकाळ डिजिटल टीम
एखादी हेव्ही साडीचा सुंदर काठ असेल. आणि तुम्ही ती नेसत नसाल तर तुम्ही त्या साड्यांपासून मस्त दुपट्टे शिवू शकता. एखाद्या प्लेन ड्रेसवर कोणत्याही साडीचा दुपट्टा शिवला की, तो अधिक चांगला उठून दिसतो.
महारसाडीपासून काहीतरी लेटेस्ट असं तुम्हाला काही शिवायचं असेल तर तुम्ही छान क्रॉप टॉप आणि लेहंगा असे देखील शिवू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स निवडता येतील. सॉफ्ट सिल्क, पैठणी, कांजिवरम अशा कोणत्याही साड्यांच्या प्रकारांपासून तुम्ही क्रॉप टॉप आणि लेहंगा निवडू शकता.
साडीचे गाऊन हे सुद्धा खूप छान दिसतात. पैठणी, इरकल,पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून ते तयार होतात. पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर. कारण तिच्यावर जरतारीचा मोर असतो. त्याचा योग्य वापर करुन तुम्हाला गाऊनचा पॅटर्न तयार करता येऊ शकतो.
ज्यांना शॉर्ट ड्रेस घालण्याची हौस असेल त्यांना जुन्या साडीतून शिवण्यासारखा हा चांगला पर्याय आहे. अशा पॅटर्नचा ड्रेस बनवण्यासाठी तुम्हाला कॉटन सिल्क मटेरिअलमधल्या मोठ्या काठाची साडी लागेल. आता या दाखवलेल्या पॅटर्नप्रमाणे बाह्या मोठ्या, फ्रंटला राऊंडनेक आणि मागे राऊंड डिपनेक आणि पोठली वर्क करु शकता.
पलाझो पँट्स हा सध्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर साड्या या देखील उत्तम पर्याय आहे तुम्ही तुमच्या सुळसुळीत साड्यांचा उपयोग करुन पलाझो पँटस शिवू शकता. हे पलाझो पँटस तुम्हाला कोणत्याही टॉपवर किंवा तुमच्या स्टाईलनुसार तुम्हाला घालता येतील.
येथे क्लिक करा...