न्यू इयरच्या पार्टीचा हँगओव्हर कसा घालवणार?

Aishwarya Musale

नवीन वर्ष

नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. अशातच तरूण मंडळींपासून ते घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी पाहायला मिळतेय.

हँगओव्हर

नवीन वर्षाच्या आधी संध्याकाळी, म्हणजे 31 डिसेंबरला, लोक साजरे करतात आणि पार्टी करतात. कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांबरोबर मजा करताना लोक खूप मद्यपान करतात. पण काही वेळा अति पार्टी केल्यामुळे लोकांना हँगओव्हर होतो.

डोकेदुखी

ज्यामुळे बहुतेक लोकांना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच डोकेदुखी आणि हँगओव्हरचा सामना करावा लागतो. हँगओव्हर उतरवण्यासाठी आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. 

इलेक्ट्रोलाईट पाणी प्या

जर तुम्ही पार्टीदरम्यान जास्त ड्रिंक घेतली असेल तर हँगओव्हरपासून मुक्त होण्यासाठी जास्त पाणी पिणं गरजेचं आहे. तुम्ही मिनरल वॉटर किंवा इलेक्ट्रोलाईट पाणी पिऊ शकता. त्यामुळे हँगओव्हरपासून लवकर सुटका होईल.

लिंबूवर्गीय फळे

जर तुम्हाला जास्त हँगओव्हर असल्यास, लिंबू पाणी किंवा सायट्रिक फळांचा रस उपयुक्त ठरू शकतो.

नारळ पाणी

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, नारळपाणी पिऊनही हँगओव्हरपासून आराम मिळतो. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अल्कोहोल प्यायल्याने शरीराचे निर्जलीकरण होते. ज्यामुळे हँगओव्हरचा धोका वाढतो.

पाण्याची कमतरता

नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. त्यामुळे तुम्ही हँगओव्हर उतरविण्यासाठी नारळ पाणी पिऊ शकता. 

आलं

आलं खाल्ल्याने हँगओव्हरपासून सुटका मिळण्यासही मदत होते. तुम्ही आल्याचे तुकडे करून ते चघळू शकता किंवा आल्याचा चहा पिऊ शकता.

बद्धकोष्ठता दूर होईल, हृदयही निरोगी राहील, भाजलेले चणे आहेत आरोग्यासाठी वरदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating roasted chickpeas | esakal
येथे क्लिक करा