Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेतील काही सामने न्युयॉर्कमधील नसाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होत आहेत.
मात्र, या स्टेडियमवर गोलंदाजांचं वर्चस्व राहिले असून फलंदाजी करताना संघांना संघर्ष करावा लागला आहे. विशेष म्हणजे या मैदानात ११ जूनपर्यंत झालेल्या सामन्यांत एकाही संघाला १५० धावांचा टप्पा पार करता आलेला नाही.
३ जून रोजी न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात श्रीलंका ७७ धावांवर सर्वबाद झाले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ४ विकेट्स गमावत ८० धावा केल्या होत्या.
५ जून रोजी झालेल्या सामन्यात आयर्लंड ९६ धावांवर सर्वबाद झाले होते. ९७ धावांचे लक्ष्य भारताने २ विकेट्स गमावत पूर्ण केले होते.
८ जून रोजी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने २० षटकात ९ बाद १०३ धावा केल्या, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्स गमावत १०६ धावा करत सामना जिंकला.
९ जून रोजी झालेल्या सामन्यात भारतीय संघ ११९ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर पाकिस्तानला २० षटकात ७ बाद ११३ धावा करता आल्या होत्या.
१० जून रोजी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ६ बाद ११३ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेशला २० षटकात ७ बाद १०९ धावाच करता आल्या होत्या.
११ जून रोजी झालेल्या सामन्यात कॅनडाला २० षटकात ७ बाद १०६ धावाच करता आल्या होत्या. त्यानंतर १०७ धावांचे लक्ष्य पाकिस्तानने ३ विकेट्स गमावत १८ व्या षटकात पूर्ण केले होते.