Pranali Kodre
टॉम लॅथमच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाने भारतीय संघाला बंगळुरूला झालेल्या कसोटी सामन्यात ८ विकेट्सने पराभूत केले.
न्यूझीलंडने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे.
यापूर्वी १९८८ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडने अखेरच्या वेळी १३६ धावांनी विजय मिळवला होता.
तसेच हा न्यूझीलंडचा भारतातील केवळ तिसराच कसोटी विजय ठरला आहे.
न्यूझीलंडने भारतात सर्वात पहिल्यांदा नागपूरला १९६९ साली झालेल्या सामन्यात १६७ धावांनी विजय मिळवला होता.
१९६९ साली न्यूझीलंडने नागपूरला ग्रॅहम डावलिंग यांच्या नेतृत्वात खेळताना भारताविरुद्ध विजय मिळवला होता.
त्यानंतर १९८८ साली न्यूझीलंडने जॉन राईट यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये भारताविरुद्ध विजय मिळवला.
आता टॉम लॅथमच्या नेतृत्वात न्यूझीलंडने बंगळुरू कसोटीत भारताविरुद्ध विजय मिळवला. (New Zealand captains to win a Test Matches in India)