Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध २६ ऑक्टोबर रोजी कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातील विजयासह न्यूझीलंडने मालिकाही खिशात घातली आहे.
न्यूझीलंडने या मालिकेतील बंगळुरूला झालेला पहिला सामनाही जिंकला होता, आता दुसरा सामना जिंकल्याने त्यांचा मालिकेतील विजय निश्चित झाला आहे. न्यूझीलंडचा हा भारतातील पहिलाच कसोटी मालिका विजय आहे.
न्यूझीलंडने आत्तापर्यंत भारताच चारच कसोटी सामने जिंकले आहेत. विशेष म्हणजे त्यातील तीन विजय न्यूझीलंडने महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या मैदानांवर मिळवले आहेत.
न्यूझीलंडने भारतात सर्वात पहिला कसोटी विजय नागपूरला १९६९ साली मिळवला होता. या सामन्यात न्यूझीलंडने १६७ धावांनी विजय मिळवला होता.
त्यानंतर न्यूझीलंडने १९८८ साली मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर १३६ धावांनी विजय मिळवला होता. हा न्यूझीलंडचा भारतातील दुसरा विजय होता.
यानंतर काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडने भारताला बंगळुरूला झालेल्या कसोटी सामन्यात २० ऑक्टोबर रोजी ८ विकेट्सने पराभूत केले. हा न्यूझीलंडचा भारतातील तिसरा कसोटी विजय होता.
यानंतर आता न्यूझीलंडने भारताला पुण्यातही पराभूत करत भारतातील चौथा विजय मिळवला आहे.