सकाळ डिजिटल टीम
नूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ३२ धावांनी पराभूत करून २०२४/२५ महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे.
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला २००९ साली सुरूवात झाली. १५ वर्षांच्या स्पर्धेच्या इतिहासात आत्तापर्यंत ४ संघानी वर्ल्ड कप जिंकला आहे.
भारताला आत्तापर्यंत एकदाही ट्वेंटी-२० वर्ल्ड जिंकता आलेला नाही. तर, ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेमध्ये वर्चस्व राहलेले आहे.
महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या १५ वर्षांच्या इतिहासात आत्तापर्यंत वर्ल्ड कप जिंकलेल्या संघांची यादी जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया संघ आत्तापर्यंत ६ वेळा महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा मानकरी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने २०१०, २०१२/१३, २०१३/१४, २०१८/१९, २०१९/२०, २०२२/२३ वर्षांमधील वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले आहे.
इंग्लंडने पहिल्याच वर्षीच्या(२००९) महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावले.
वेस्ट इंडिजने भारतामध्ये झालेला २०१५/१६ मधील वर्ल्ड कप जिंकला.
न्यूझीलंड
न्यूझीलंडने यावर्षी (२०२४/२५) पहिल्यांदा महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले आहे.