Aishwarya Musale
बाळाला रोज आंघोळ घातली पाहिजे. आंघोळ घालताना बाळाच्या अंगाला तेल लावायला हरकत नाही पण नाकात, कानात तेल सोडणे चुकीचे आहे.
आंघोळ घालताना खूप गरम पाणी वापरू नये. तसेच त्याला सहन होईल असे कोमट पाणी वापरावे. बाळाचे हात, पाय हलक्या हाताने चोळावेत.
दूध, हळद डाळीचे पीठ एकत्र करून अंगास लावावे व नंतर पाण्याने किंवा साबणाने अंग स्वच्छ धुवावे.
आंघोळ झाल्यावर मऊ आणि स्वच्छ कापडाने बाळाचे अंग पुसून घ्यावे.
बाळाने कपडे ओले केले असतील तरीही ते रडत किंवा पोट दुखण्यामुळेही रडू शकते. रडण्याचे कारण नीट शोधावे व उपाय करावेत.
बाळाचे कपडे सैल असावेत. सुती असावेत. थंडीच्या दिवसात गरम कपडे असावेत पण ते आतून मऊ असावेत.
नायलॉनचे कपडे वापरू नयेत. त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच ओले केलेले कपडे त्वरित बदलावेत. कपडे स्वच्छ असावेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.