Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत वेस्ट इंडिजने २१ जून रोजी सुपर-८ सामन्यात अमेरिकेला ९ विकेट्सने पराभूत केले.
या सामन्यात निकोलस पूरनने १२ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह २७ धावांची खेळी केली.
पूरनने या खेळीदरम्यान टी२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये १७ षटकार पूर्ण केले.
त्याचमुळे आता एकाच टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम पूरनच्या नावावर झाला आहे.
याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. त्याने २०१२ टी२० वर्ल्ड कपमध्ये ७ सामन्यांत १६ षटकार मारले होते.
एकाच टी२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाच्या यादीत पूरन आणि गेलच्या खालोखाल मार्लन सॅम्युअल्स आहे. त्यानेही २०१२ टी२० वर्ल्ड कपमध्ये ७ सामन्यांत १५ षटकार मारले.
शेन वॉटसनही सॅम्युअल्ससह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानेही २०१२ टी२० वर्ल्ड कपमध्येच ६ सामन्यांत १५ षटकार मारले होते.