Anuradha Vipat
निखिल दामले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे
आता निखिल दामलेने एका मुलाखतीदरम्यान रितेश देशमुखने त्याला काय सल्ला दिला होता याचा खुलासा केला आहे
तसेच निखिल दामलेने बिग बॉसमधील त्याचा प्रवास कसा होता याबद्दल वक्तव्य केले आहे.
मुलाखतीत निखिल म्हणाला की, रितेशसरांनी सांगितलं होतं की प्रत्येक वेळी तुम्ही आवाज चढवून भांडण केले पाहिजे असा अट्टहास नको.
पुढे मुलाखतीत निखिल म्हणाला की, तुमची पद्धत जर वेगळी असेल तर तुमच्या पद्धतीनंही मत मांडण्यात कमी पडू नका. तुम्ही त्याबद्दल काही वक्तव्य केलं नाही, असं होऊ देऊ नका.
निखिल दामलेबरोबरच योगिता चव्हाणदेखील घराबाहेर पडली आहे.
बिग बॉसच्या पाचव्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते.