Anuradha Vipat
बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीचं सतत वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडणं व्हायची.
आता या भांडणांबद्दल निक्की नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली आहे
निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं सिझन चांगलंच गाजवलं आहे
मुलाखतीत तू वर्षा उसगांवकरांबद्दल कधीच ऐकलं नव्हतंस का असा प्रश्न निक्कीला विचारण्यात आला.
त्यावर निक्की म्हणाली की, मी खरंच त्यांच्याबद्दल कधी ऐकलं नव्हतं. मला मी त्यांना ओळखते असं बोलून लोकांची सहानुभूत घ्यायची किंवा मी त्यांना ओळखत नाही असं बोलून त्यांचा द्वेष पत्करायचा याचा मी विचारत केला नव्हता.
पुढे निक्की म्हणाली की, जेव्हा घरात हळूहळू इतर सेलिब्रिटी येऊ लागले आणि त्यांच्याबद्दल कौतुक करू लागले, बोलू लागले तेव्हा मला समजलं की त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत.
बिग बॉसच्या घरात निक्कीने वर्षाताईंशी भांडणं केली यावर तिने त्यांची माफीसुद्धा मागितली आहे