निकोला टेस्ला यांच्या पाच भविष्यवाण्या; ज्या आज झाल्यात खऱ्या

Sudesh

टेस्ला

19व्या शतकातील एक महान वैज्ञानिक म्हणून निकोला टेस्ला यांचं नाव आज आदरानं घेतलं जातं.

Nikola Tesla Predictions | eSakal

भाकितं

आपल्या तंत्रज्ञानामुळे काय घडू शकतं याबाबत टेस्ला यांनी काही भाकितंही केली होती. यातील बरीच भाकितं आज खरी झाली आहेत.

Nikola Tesla Predictions | eSakal

वाय-फाय

टेस्ला यांना पहिल्यापासूनच वायरलेस टेक्नॉलॉजीमध्ये रस होता. रेडिओच्या शोधाचं श्रेय गुइलेर्मो मार्कोनी यांना दिलं जात असलं, तरी त्याचा खरा जनक टेस्लाच.

Nikola Tesla Predictions | eSakal

वाय-फाय

टेस्लांनी असं म्हटलं होतं, की एक दिवस टेलिफोन सिग्नल, डॉक्युमेंट्स, ऑडिओ फाईल्स आणि व्हिडिओही पाठवण्यासाठी वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर होईल. आज वायफायच्या रुपाने हे शक्य झालं आहे.

Nikola Tesla Predictions | eSakal

मोबाईल

1926 साली एका मुलाखतीत टेस्ला यांनी 'पॉकेट टेक्नॉलॉजी'चा उल्लेख केला आहे. फोटो, ऑडिओ, व्हिडिओ पाठवणारं हे यंत्र असेल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आपला स्मार्टफोन आज हेच तर करतो.

Nikola Tesla Predictions | eSakal

ड्रोन

1898 साली टेस्ला यांनी एक वायरलेस रिमोटने चालणारे ऑटोमेशन मशीन सादर केलं होतं. याचंच आधुनिक रुप म्हणजे आजची ड्रोन टेक्नॉलॉजी.

Nikola Tesla Predictions | eSakal

विमान

तेव्हाच्या काळी विमानांवर नक्कीच काम सुरू होतं. मात्र, टेस्ला म्हणाले होते, की भविष्यात भरपूर लोकांना एकाच वेळी अत्यंत वेगाने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणारी विमानं अस्तित्वात येतील.

Nikola Tesla Predictions | eSakal

हायटेक विमान

टेस्ला यांनी याबाबत असंही म्हटलं होतं, की ही विमानं वीजेवर चालतील. त्यांची अर्धी भविष्यवाणी तर खरी झाली आहे. उरलेली अर्धीही भविष्यात नक्कीच सत्यात उतरेल.

Nikola Tesla Predictions | eSakal

महिला सबलीकरण

टेस्ला म्हणाले होते, की भविष्यात महिला अधिक चांगलं शिक्षण, नोकरी आणि सामाजिक कार्यांसाठी वायरलेस तंत्रज्ञानाचा वापर करतील. सध्या तंत्रज्ञान क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात पुढे आहेत, आणि सोशल मीडियाचा वापर करुन सामाजिक क्रांतीही घडवत आहेत.

Nikola Tesla Predictions | eSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

newton philosopher's stone | eSakal
येथे क्लिक करा