निळू भाऊंमुळे अश्विनी यांना मिळाली रातोरात प्रसिद्धी

सकाळ डिजिटल टीम

एव्हरग्रीन अश्विनी

अभिनेत्री अश्विनी भावे या त्याच्या दर्जेदार अभिनयासाठी आणि एव्हरग्रीन सौंदर्यसाठी प्रसिद्ध आहेत.

सिनेमा

माधुरी दीक्षितबरोबर कायम तुलना केल्या जाणाऱ्या अश्विनी यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम केलं.

प्रसिद्धी

पण एका सिनेमाने त्यांना रातोरात प्रसिद्धी दिली आणि अश्विनी मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्री ठरल्या.

गाजलेला सिनेमा

हा सिनेमा होता 'हळद रुसली कुंकू हसलं'. पण तुम्हाला माहितीये का ? अश्विनी हा सिनेमा सोडणार होत्या.

सिनेमातील अडचणी

आरपार या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये अश्विनी यांनी हा किस्सा शेअर केला. त्या म्हणाल्या कि, सिनेमाचं शूटिंग खूप आडगावात होतं आणि मला राहायला दिलेली जागाही बरोबर नव्हती.

सिनेमा सोडण्याचा निर्णय

एका अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीमध्ये शेड टाकून त्या खोलीत मला राहायला जागा दिली. मी चिडून तो सिनेमा सोडणार होते. मी बाहेर आले तेव्हाच निळू भाऊ मला भेटले.

निळूभाऊंचा सल्ला आणि परिणाम

ते मला म्हणाले ,"तो निर्माता चांगला आहे. उत्तम सिनेमा बनवेल." त्यांच्यासारख्या मोठ्या अभिनेत्याने हे म्हंटल्यावर मी ऐकलं आणि थांबले. खरंच हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमामुळे मला अर्धा महाराष्ट्र ओळखतो.

निकीचं बोल्ड फोटोशूट - येथे क्लिक करा