Anuradha Vipat
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे.
१२ जुलैला या जोडप्याचा विवाहसोहळा बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये थाटामाटात पार पडला.
रविवारी या जोडप्याने खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.
यावेळी नीता अंबानी यांनी मुलाच्या रिसेप्शन सोहळ्यात माध्यमांसमोर येऊन सर्वांचे आभार मानले.
नीता अंबानी म्हणाल्या, “नमस्कार…तुम्ही सगळे एवढ्या दिवसांपासून अनंत आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित आहात. तुमचे मनापासून आभार
पुढे नीता अंबानी म्हणाल्या, हे लग्नघर आहे आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झालात ही मोठी गोष्ट आहे.
पुढे नीता अंबानी म्हणाल्या, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर हे लग्नघर आहे असं समजून आम्हाला माफ करा आणि उद्याच्या पार्टीत नक्की सहभागी आहे.