Anuradha Vipat
कलादिग्दर्शक म्हणून फारच थोड्या अवधीत चित्रपटसृष्टीत आपले स्वत:चे खास स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई.
‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटापासून नितीन देसाई स्वतंत्रपणे कलादिग्दर्शन करू लागले.
खामोशी द म्युझिकल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘द लिजंड ऑफ भगतसिंह’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘जोधा अकबर’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट.
‘सलाम बॉम्बे’, ‘बुद्धा’, ‘जंगल बुक’, ‘कामसूत्र’, ‘सच अ लाँग जर्नी’, ‘होली सेफ’ या हॉलिवूडपटांसाठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले.
नितीन देसाई यांनी ‘चंद्रकांत प्रॉडक्शन कंपनी लि.’ची स्थापना केली असून त्या अंतर्गत ‘माँ आशापुरा मतवाली’ या चित्रपटाची निर्मितीही केलेली आहे.
तब्बल चार चित्रपटांसाठी त्यांना कलादिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
चित्रपटांखेरीज दूरदर्शन मालिकांसाठी, तसेच ‘गेम शोज’साठीही त्यांनी कलादिग्दर्शन केले. ‘
कौन बनेगा करोडपती’साठी देसाई यांनी उभारलेला सेट खूप गाजला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.