सकाळ डिजिटल टीम
बांगलादेशविरूद्ध ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामना भारताने ८६ धावांनी जिंकला.
मागच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात नवा विक्रम रचला आहे.
नितीश कुमार रेड्डीने या सामन्यात ३४ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या व २ विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे नितीश भारतीय दिग्गज खेळाडू युवराज सिंगच्या पंगतीत जावून बसला आहे.
भारतासाठी एकाच ट्वेंटी-२० सामन्यात ५० अधिक धावा आणि २ पेक्षा जास्त विकेट्स घेणारे खेळाडू कोणते हे जाणून घेऊयात.
युवराज सिंगने २००९ साली श्रीलंकेविरूद्ध असा विक्रम केला होता.
२०२२ साली इंग्लंविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने अशी कामगिरी केली.
अक्षर पटेलने २०२३ साली ही श्रीलंकेविरूद्ध ही कामगिरी केली.
वॉशिंग्टन सुंदरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध २०२३ साली सा विक्रम केला होता.
बांगलादेशविरूद्ध सामन्यात युवा अष्टपैलू खेळाडू ही कामगिरी करत या यादीत स्थान मिळवले आहे.