नताशापूर्वी 'या' अभिनेत्रींबरोबर होता हार्दिक रिलेशनशिपमध्ये

सकाळ डिजिटल टीम

इंडियन क्रिकेटर हार्दिक पंड्या सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशाने एकमेकांशी घटस्फोट घेण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला.

Hardik Pandya

नताशा आणि हार्दिकच्या लग्नाला चार वर्षं झाली होती आणि त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा सुद्धा आहे. नताशा हार्दिकच्या आयुष्यात येण्यापूर्वीही हार्दिकचं अनेक अभिनेत्रींबरोबर नाव जोडलं गेलं. जाणून घेऊया त्याच्या या कथित अफेअर्सविषयी.

Hardik Pandya

हार्दिक पंड्याचं पहिलं गाजलेलं रिलेशन होतं कोलकातामधील सुप्रसिद्ध मॉडेल लिशा शर्मा बरोबर. २०१६ साली हे दोघं डेट करत होते पण त्यांचा वर्षभरातच ब्रेकअप झाला.

Hardik Pandya

त्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात आली परदेशी मॉडेल एली अवराम. या दोघांनी अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं पण कधी रिलेशनशिपची कबुली दिली नाही. २०१७ साली कृणाल पंड्याच्या लग्नातही एली हजर होती पण २०१८ मध्ये यांचं रिलेशन संपुष्टात आलं.

Hardik Pandya

यानंतर हार्दिकचं नाव जोडलं गेलं बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताबरोबर. ईशा आणि हार्दिक डेट करत असल्याच्या चर्चा होत्या पण लवकरच त्यांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं.

Hardik Pandya

त्यानंतर हार्दिक आणि उर्वशी रौतेला डेट करत असल्याची चर्चा होती. तिला अनेकदा कृणाल आणि हार्दिकबरोबर फोटॉग्राफर्सनी स्पॉट केलं होतं पण आम्ही चांगले मित्र आहोत असं उर्वशीने स्पष्टीकरण दिल.

Hardik Pandya

कॉफी विथ करणमुळे हार्दिकच्या प्लेबॉय इमेजची चर्चा झाली होती. त्यातच त्याची अफेअर्स कायमच लाइमलाईटमध्ये राहिली.

Hardik Pandya
bhuvan bam
आई-वडिलांच्या अकाली मृत्यूचा धक्का - येथे क्लिक करा