सकाळ डिजिटल टीम
Ratnagiri Tourism : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून गणपतीपुळेची ओळख आहे.
यंदा लोकसभा निवडणूक आणि उन्हाचा कडाका यामुळे पर्यटक फिरण्यासाठी बाहेरच पडलेले नाहीत.
परिणामी, गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळावर चाळीस टक्केच पर्यटक आहेत. त्यामध्ये स्थानिक पर्यटकही आहेत. पर्यटक कमी असल्यामुळे फेरीवाले आणि अन्य व्यावसायिकांना फटका बसला आहे.
गणपतीपुळे येथील किनाऱ्यावर पर्यटकांचा राबता घटला आहे.
पर्यटकांची प्रतीक्षा करणारे फेरीबोट, जेटस्की चालक.
किनाऱ्यावरील अर्ध्या भागात शुकशुकाट.
पर्यटक नसल्यामुळे फेरीबोटी पाण्यामधून बाहेर किनाऱ्यावर ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर आली आहे.
स्टॉलवरही अपेक्षित गर्दी नाही. (फोटो : किसन जाधव, गणपतीपुळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.