सकाळ डिजिटल टीम
आपण दररोज किमान २ उकडलेली अंडी खावीत. उकडलेली अंडी आरोग्यासाठी फायदेशीर असणारी उच्च-गुणवत्तेची प्रथिने, विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे देतात. उकडलेले अंडी खाल्ल्याने तुम्हाला मिळू शकणारी महत्त्वाची पोषक तत्वे पुढील प्रमाणे:
एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रथिने असतात. प्रथिने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात.
व्हिटॅमिन-ए निरोगी दृष्टी, त्वचेची सुरक्षा, रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी आवश्यक आहे.
हाडांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन-बी १२ हे ऊर्जा पातळी राखण्यात मदत करते आणि संज्ञानात्मक आरोग्यास निरोगी ठेवते.
व्हिटॅमिन-बी २ चरबी, प्रथिने आणि चयापचय करण्यास मदत करते. हे जीवनसत्व निरोगी त्वचा आणि डोळ्यांना देखील मदत करते.
लाल रक्तपेशी निर्मिती आणि संपूर्ण सेल्युलर आरोग्यासाठी फोलेट आवश्यक आहे.
सेलेनियम हा एक महत्त्वाचा अँटिऑक्सिडेंट आहे जो पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतो.
कोलीन मेंदूचे आरोग्य, यकृताचे कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
लोह संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यास मदत करते आणि शरीरा ऊर्जा पूरवते.
अंड्यांमध्ये झिंक भरपूर असते. जे रोगप्रतिकारक कार्य, जखमा बरे करणे आणि सेल्युलर क्षमता वाढवते.