Sudesh
जगभरात लठ्ठपणा एक मोठी समस्या झाली आहे. लॅन्सेटने याबाबत नुकताच एक अहवाल जारी केला आहे.
जगातील एकूण लठ्ठ व्यक्तींची संख्या एक अब्जांपेक्षा अधिक झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे.
जगभरात मुले व प्रौढांमध्ये १९९०च्या तुलनेत २०२२ मध्ये लठ्ठपणाचे प्रमाण चौपट झाल्याचेही एका सर्व्हेमध्ये समोर आलं आहे.
अनेक देशांत कुपोषणाचा सर्वाधिक सामान्य प्रकार म्हणून लठ्ठपणा वाढत आहे.
मुलींमधील लठ्ठपणाचा दर १९९० मधील ०.१ टक्क्यांवरून २०२२ मध्ये ३.१ टक्क्यांवर तर मुलांमध्ये ०.१ टक्क्यांवरून ३.९ टक्क्यांवर गेला आहे.
जगात एकूण 16 कोटी मुलं आणि 88 कोटी प्रौढ लोक स्थूल असल्याचं आकडेवारीमध्ये समोर आलं आहे.
भारतामध्ये 1.25 कोटी लहान मुलं स्थूल आहेत. यामध्ये 73 लाख मुलं आहेत तर 52 लाख मुली आहेत.
देशात प्रौढांमध्ये एकूण लठ्ठ पुरूषांची संख्या 2.60 कोटी आहे, तर महिलांची संख्या 4.40 कोटी आहे. एकूणच भारतात महिलांच्या लठ्ठपणाचं प्रमाण अधिक आहे.