Swadesh Ghanekar
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने याने ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये भारताला पदक जिंकून दिले.
मनु भाकर हिच्यानंतर पॅरिसमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत ३ पदक जिंकण्याची ही भारताची पहिलीच वेळ ठरली.
१९५२ नंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. यापूर्वी खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते.
राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेला नेमबाज स्वप्नीलकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वडिलांना पदकाची आशा होतीच आणि त्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.
स्वप्नील कुसाळेने ४५१.४ गुणांसह कांस्यपदक पटकावले. स्वप्नीलच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर वडील सुरेश कुसळे म्हणाले, मला खात्री होती, स्वप्नील पदक जिंकेल. गेल्या १२-१३ वर्षांची तपश्चर्या कामी आली.
२००८ मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर स्वप्नीलला प्रेरणा मिळाली. ती मॅच पाहण्यासाठी त्याने १२ वीचा पेपरही बुडवला होता.
२००९ मध्ये त्याच्या नेमबाजीच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आज तो पॅरिस ऑलिम्पिक गाजवायला सज्ज झाला आहे.
स्वप्नील कुसाळे याने त्याच्या मणक्यावर महामृत्यूंजय मंत्राचा टॅटू गोंदवला आहे आणि त्याची आता चर्चा सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.