पीव्ही सिंधूसाठी मनू भाकरने काढलेलं फेक अकाउंट

Pranali Kodre

मनू भाकर

भारतीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकत इतिहास रचला आहे.

Manu Bhaker | Paris Olympic 2024 | Sakal

दोन कांस्य पदके

तिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात आणि मिश्र सांघिक १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सरबज्योत सिंगसह कांस्य पदक जिंकले.

Manu Bhaker and Sarabjot Singh | Paris Olympic 2024 | Sakal

मोठा खुलासा

दरम्यान कामगिरीनंतर तिने एक मोठा खुलासा केला आहे. तिने पीव्ही सिंधूसाठी सोशल मीडियावर फेक अकाऊंट काढल्याचं सांगितलं आहे.

Manu Bhaker | Paris Olympic 2024 | Sakal

...त्यांच नेहमीच कौतुक

मनूने स्पोर्ट स्टारशी बोलताना सांगितलं की 'मला भारतीय क्रीडा इतिहासातील अनेक दिग्गजांबद्दल माहित आहे. मला नेहमीच पीव्ही सिंधू आणि नीरज चोप्राबद्दल माहित होते. त्यांनी केलेल्या मेहनतीचे मला नेहमीच कौतुक वाटले आहे.'

Manu Bhaker | Paris Olympic 2024 | Sakal

का बनवलेलं फेक अकाउंट?

मनूने पुढे सांगितलं, 'एक वेळ अशी आलेली की मी सिंधूसाठी फेक प्रोफाइल बनवलं होतं. काही टीकाकारांनी कमेंट्स केल्या होत्या, ज्यामुळे मी सिंधूच्या बाजूने उभं राहण्यासाठी फेक अकाउंट बनवलं होतं.'

Manu Bhaker | Sakal

सिंधूची प्रतिक्रिया

मनूने केलेल्या या खुलास्यावर पीव्ही सिंधूनेही एक्सवर प्रतिक्रिया दिली आहे. सिंधूने लिहिलं, 'हाहा तू स्विटहार्ट आहेस. दोन ऑलिम्पिक मेडल क्लबमध्ये तुझं स्वागत आहे मनू. अजून खूप पुढे जायचं आहे.'

PV Sindhu | Sakal

दुसरीच भारतीय महिला खेळाडू

सिंधूनंतर ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर दुसरीच भारतीय महिला खेळाडू आहे.

PV Sindhu | Sakal

लेकाच्या वाढदिवसाला हार्दिकनं शेअर केलेला Video पाहिला का?

Hardik Pandya with Son | Instagram
येथे क्लिक करा