पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी 'हे' 6 चित्रपट पाहिले नसतील तर नक्की पाहा

Pranali Kodre

पॅरिसमध्ये ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेला २६ जुलै रोजी सुरुवात होणार आहे.

Olympic Games | Sakal

या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी क्रीडा क्षेत्राशी निगडीत काही चित्रपट तुम्ही पाहू शकतात. असे कोणते चित्रपट तुम्ही पाहू शकता, याबाबत माहिती घेऊ.

Olympic Games | Sakal

मिरॅकल (Miracle)

मिरॅकल हा चित्रपट अमेरिकेच्या पुरुष हॉकी संघावर अधारिक आहे, ज्यांनी १९८० ऑलिम्पिक्समध्ये बलाढ्य सेवियत यूनियन संघाचा पराभव केला होता.

Miracle Movie

चॅरिएट ऑफ फायर (Chariots of Fire)

इंग्लिश ऍथलिट्स एरिक लिडेल आणि हारोल्ड अब्रहम्स यांच्यावर अधारित आहे, ज्यांनी १९२४ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता आणि मेडलही जिंकले होते.

Chariots of Fire

विदाउट लिमिट्स (Without Limits)

हा चित्रपट धावपटू स्टीव्ह प्रिफॉन्टेन आणि त्याचे प्रशिक्षक बिल बोवरमॅन यांच्यावर अधारित आहे. बॉवरमॅन हे नाईके या प्रसिद्ध कंपनीचे सहसंस्थापक आहेत.

Without Limits

भाग मिल्खा भाग (Bhaag Milkha Bhaag)

भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्या जीवनावर अधारित हा चित्रपट आहे. त्यांनी १९६० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Bhaag Milkha Bhaag

टोकियो ऑलिम्पियाड (Tokyo Olympiad)

हा एक डॉक्युमेंट्री चित्रपट आहे, जो १९६४ साली झालेल्या ऑलिम्पिकवर अधारित आहे.

Tokyo Olympiad

आय, टोन्या (I, Tonya)

हा अमेरिकन ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट अमेरिकन फिगर स्केटर टोन्या हार्डिंगची कारकिर्द आणि तिची प्रतिस्पर्धी नॅन्सी केरिगनवरील 1994 च्या हल्ल्याशी संबंधित आहे.

I, Tonya

"माझ्या अन् सचिनपेक्षा 'तो' भारी", ब्रायन लाराचा दावा

Brian Lara Sachin Tendulkar | Sakal
येथे क्लिक करा