19 November In History: आजच्या दिवशी काय घडलं, वाचा एका क्लिकवर

पुजा बोनकिले

1898

भारताचा अतिप्राचीन इतिहास, भारत-चीन संबंध आणि चिनी भाषा यांचे अभ्यासक प्रबोधचंद्र बागची यांचा जन्म.

Sakal

1901

चित्रपती म्हणून ओळखले जाणारे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते व्ही. शांताराम यांचा जन्म. "पद्मभूषण', "दादासाहेब फाळके पुरस्कार' आदींनी त्यांच्या कलागुणावर राज्यमान्यतेचे शिक्कामोर्तब झाले.

Sakal

1967

आसामातील प्रसिद्ध निसर्गकवी रघुनाथ चौधरी यांचे निधन. निसर्गातील पक्षांचे त्यांना विशेष वेड असल्याने "विहंगकवी' म्हणून ओळखले जात.

Sakal

1993

लोणावळा येथील मनःशक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद तथा श्री. पु. रा. भिडे यांचे निधन.

Sakal

1996

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे प्रारंभापासूनचे नेते कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई यांचे निधन.

Sakal

1998

साताऱ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, साहित्यिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या रामकृष्ण नारायण ऊर्फ बन्याबापू गोडबोले यांचे निधन.

Sakal

2001

गांधीवादी विचारवंत व "नॅडेप' कंपोस्ट खताचे जनक नारायण देवराम पांढरीपांडे यांचे निधन. गाईच्या शेणापासून "कंपोस्ट' खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. ही पद्धती भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली.

Sakal

2002

हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते व ऑस्कर पुरस्कारविजेते जेम्स कोबर्न यांचे निधन. त्यांचे "पॅट गॅरेट अँड बिली द किड", "यंग गन्स", "अवर मॅन फ्लिंट", "इन लाइक फ्लिंट" आदी चित्रपट गाजले होते.

Sakal

२०१७

मिस वर्ल्ड या सौंदर्याच्या जगतातील सर्वोच्च स्पर्धेत ‘मिस इंडिया’ मनुषी चिल्लरने बाजी मारली. विशेष म्हणजे तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय सौंदर्यवतीने हा मानाचा मुकुट पटकावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal