पुजा बोनकिले
भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचा जन्म. त्यांनी वनस्पतींचे आकारविज्ञान (वनस्पतींच्या बाह्य स्वरूपाचा अभ्यास करणारे शास्त्र) व गर्भविज्ञान यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले.
स्त्रीशिक्षणाचे महान प्रसारक, महिला विद्यापीठाचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन. त्यांना "भारतरत्न' हा सर्वोच्च सन्मान मिळाला होता.
मराठी चित्रपट व रंगभूमीवरील नामवंत अभिनेते बाबूराव पेंढारकर यांचे निधन.
पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) रसायन विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. पी. के. रांजेकर व रसायन अभियांत्रिकी विभागाचे डॉ. व्ही. आर. चौधरी यांना अहमदाबादच्या नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सन्माननीय सदस्यत्व देऊन गौरविले.
ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगीळ यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार प्रदान.
जगप्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासोचे एक चित्र न्यूयॉर्क येथे झालेल्या लिलावात 5 कोटी 56 लाख डॉलरला विकले गेले. पिकासोच्या चित्राच्या किमतीबाबतचा हा विक्रम होय.
ध्वनीच्या वेगाने प्रवास करणाऱ्या "ब्राह्मोस' क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी. हे 290 किलोमीटर पल्ल्यापर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र दोनशे किलोपर्यंत वजनाची पारंपरिक शस्त्रे वाहून नेऊ शकते.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहिंदर अमरनाथ यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे ‘सी. के. नायडू जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर.